Click Here...👇👇👇

आपल्या नावापेक्षा गाडगे बाबा आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक सुपरिचीत:- प्रा. डॉ. टि. एफ. गुल्हाणे

Bhairav Diwase
चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे कर्मयोगी गाडगे महाराज जयंती साजरी.
Bhairav Diwase.          Feb 23, 2021
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे कर्मयोगी गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. टि. एफ. गुल्हाणे होते. प्रा. डॉ. टि. एफ. गुल्हाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आपल्या नावापेक्षा गाडगे बाबा आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक सुपरिचीत झालेले एक थोर समाजसुधारक म्हणुन आज देखील आदराने ज्यांचे नाव आपल्या ओठांवर येते ते संत गाडगे महाराजांचे.

त्या काळी भारतीय ग्रामिण समाजात मोठया प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांमुळे बदल घडुन आला. आज देखील अनेक राजकिय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या केलेल्या कार्यातुन प्रेरणा घेत आहेत.

   यावेळी कार्यक्रमाला प्रा. नितीन उपर्वट, प्रा. ओमप्रकाश सोनोने प्रा. डॉ पुर्णिमा मेश्राम, डॉ. संघपाल नारनवरे व, प्रा. विजय बुधे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.