🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वाढीव वीजबिल जो पर्यंत राज्यसरकार माफ करणार नाही, तो पर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही.

जिवती भाजपाचे वीज देयक माफी करिता टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अव्वाच्या सव्वा विजबिल पाठवणाऱ्या व विज ग्राहकांचे  कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून जनतेला अंधारात टाकण्याचे महापाप करणाऱ्या महविकास आघाडी सरकारच्या विरोधात "टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन" तालुका अध्यक्ष केशव पाटिल, गीरमाजी सुरेश केन्द्रे, महेश देवकते, दत्ता राठौड़ यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी, जीवती यांच्या वतीने शनिवार 06/02/2021 रोजी सकाळी 12 वा. तहसील कार्यालय येथे करण्यात आले. कोरोनाकाळातील वाढीव वीजबिल  माफ करावे याकरिता भारतीय जनता पार्टी जीवती  कडून चारवेळा आंदोलन करण्यात आले ,अजूनही  सामान्य जनतेचा आवाज राज्यसरकारच्या कानात जात नाही याचा अर्थ राज्यसरकार बधिर झाले आहे, "जनतेचे मरण,  हेच राज्यसरकारचे  धोरण" अजूनही विजबिलासंदर्भात सरकार गंभीर नाही , जो पर्यंत वाढीव वीजबिल माफ करणार नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, जीवती येथील वाढीव वीजबिल आंदोलनात एम. एस.इ.बी कार्यालयात टाळे ठोकून भा ज यू मो जिल्हा महामंत्री महेश देवकते यांनी राज्य सरकारला इशारा दिला .

महाविकास आघाडी सरकारला नारे घोषणाबाजी करत तहसील कार्यालय चौकातून काढण्यात आली.

 एमएसईबी कार्यालयात जाऊन  कार्यालयास टाळा ठोकून टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.
 यावेळी केशव पाटिल गिरमाजी म्हणाले गोर गरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी भाजपाने 4 वेळा आंदोलन केले. याची दखल घेऊन सरकारने वीज बिल माफ करू असे उत्तर दिले. विधानसभेत 100 युनिट प्रति महिना माफ करू असे सांगितले, ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा वीज बिल माफ करू असे आश्वासन दिले होते. हे सरकार फसवे, खोटे आश्वासन देणारे दिशाभूल करणारे सरकार आहे. सरकारने वीज माफिचा शब्द पाळला नाही.
 केंद्र सरकार लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर उभी राहिली देशातील गोरगरीब जनतेला धान्य वाटप ,उज्वला गॅस वितरण , व जनधन खात्याच्या माध्यमातून गरिबांना आर्थिक मदत केली पण राज्य सरकार  मात्र राज्यातील जनतेला कोणतेही मदत करायला तयार नाही याउलट राज्यातील 75 लाख गोर गरीब कुटुंबियांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीसा देऊन 4 कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे महापाप करत आहे.
 कोणताही एमएसईबी चा कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यासाठी सामान्य जनतेच्या घरी पोहचला तर भाजपाचा कार्यकर्ता वीज खंडित होऊ देणार नाही. एमएसईबी चे कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यास गेले तर भाजपाचा कार्यकर्ता परतवून लावेल .  
आंदोलना दरम्यान कुठं गेले कुठं गेले 200 युनिट कुठं गेले, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, काँग्रेस सरकावीज बिल आमचा अधिकार आहे असे नारे लावण्यात आले.

याप्रसंगी जिवती चे ठाणेदार श्री अंबिके साहेब तसेच महावितरण चे सहाय्यक व कर्मचारी  यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा  तसेच युवा मोर्चा  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते  
            या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी सुरेश केन्द्रे दत्ता राठोड़ महेश देवकते बंसी जाधव गोपीनाथ चाव्हाण राजेश राठौड़ दसरथ राठोड़ माधव कुलसंगे दत्ता शिंदे अंकुश येमला गोविंद टोकरे बालाजी भुते पंढरी वाघमारे कैलाश आडे फरीद शेख सुभाष पावर बालाजी माने विलाश चाव्हाण रेखु राठोड़ धनराज आड़े बंटी चव्हाण भारत चव्हाण संग्राम राठोड़ प्रेम राठोड़ प्रलाद मदने राजेश हरी राठोड़ विजय गोतावले लक्ष्मण पवार गणेश राठोड़ जनार्दन चव्हाण व आदि भाजपा कार्यकर्ता युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते