🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

स्टेजवर नवरदेवाचा कारनामा पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरी.

Bhairav Diwase.       Feb 07, 2021

लग्न समारंभात सगळेच मजा-मस्ती करतात. खाणं-पिणं, नाचणं-गाणं आणि फोटो काढण्याची मजा असते. अशात सर्वात जास्त फोटो काढले जातात ते नवरी-नवरदेवाचे. कारण त्यांच्यासाठी हा दिवस यादगार असतो. पण लग्नाच्या स्टेजवर असेच यादगार फोटो काढत असलेल्या फोटोग्राफरला नवरदेवाच्या रागाच्या सामना करावा लागला. हा क्षण असा होता की, इतर सर्वांसाठी यादगार बनला.

लग्नाच्या स्टेजवर फोटोग्राफरच्या वागण्याने हैराण झालेल्या नवरदेवाने त्याच्यासोबत असं काही केलं की, नवरी स्टेजवरच खाली पडून जोरजोरात हसू लागली. तिचं हे हसणं पाहून सोशल मीडियावरील लोक लोटपोट होऊन हसत आहेत. 

हा व्हिडीओ ट्विटरवर रेणुका मोहन नावाच्या एका यूजरने शेअर केला. या व्हिडीओच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, 'आय जस्ट लव दिस ब्राइड! 

या व्हिडीओत बघू शकता की, हार घालण्यापूर्वी कपलचे सिंगल फोटो घेतले जात आहेत. फोटोग्राफर पुन्हा पुन्हा नवरीच्या हनुवटीला हात लावून तिला बरोबर पोज देण्यास सांगत आहे. नवरदेव बाजूला उभा राहून हे सगळं बघत आहे. हे पाहून तो संतापतो आणि फोटोग्राफरच्या पाठीवर एक धपाटा देतो.

नवरदेवाचं हे रूप पाहून नवरी स्टेजवरच सर्वांसमोर जोरजोरात हसू लागते. तेच फोटोग्राफरला काही समजलं नाही आणि तो सुद्धा या गमतीत सहभागी होऊ हसू लागतो. पण या व्हिडीओत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते नवरीच्या लोटपोट होऊन हसण्याने. ती कशाचाही विचार न करता लोटपोट होऊन हसत आहे.

काही तासांपूर्वी पोस्ट झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ हजार लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आणि ८०० वेळा रिट्विट केलं आहे.

Popular posts......लोकप्रिय पोस्ट ......

गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी..... 

आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या. 

चंद्रपूरांनो सावधान! 500 रु. तर मिळणार नाहीत, पण गंडा कितीचा बसेल सांगताही येणार नाही. 

राजुरा ब्रेकिंग न्यूज; राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक.