Top News

चंद्रपूरांनो सावधान! 500 रु. तर मिळणार नाहीत, पण गंडा कितीचा बसेल सांगताही येणार नाही.

Bhairav Diwase. Oct 28, 2020

चंद्रपूर:- सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप स्टेटस वापरून तुम्ही घरबसल्या 500 रुपये कमावू शकता. फक्त अट एकच तुमचे स्टेटस किमान 30 लोकांनी बघितले पाहिजे, अशा आशयाचा संदेश आज सकाळपासून व्हायरल होतोय. अनेक जणांनी हा संदेश आपल्या स्टेटसलासुद्धा ठेवला. संदेशासोबत एक लिंक सुद्धा आहे, ज्यावर 500 रुपये मिळकतीसाठी रजिस्ट्रेशन करायला सांगितले जाते. लिंक उघडल्यानंतर त्यावर वापरकर्त्याची संपूर्ण माहिती मागवली जाते. ज्यात नाव, पत्ता, मोबाइल नंबर, इ - मेल आयडी मागवला जातो. पैसे कमावण्याचे आमिष दाखवून 1400 रुपयांपेक्षा जास्त रकमेची मागणीसुद्धा केली जाते. सकाळपासून अनेक जणांनी लिंक ओपन करून दिवसाला 500 रुपये मिळतील या मोहापायी काही रक्कमसुद्धा डिपॉझिट केल्याची माहिती मिळत आहे. ज्यांनी रक्कम डिपॉझिट केली त्यांना आपण रक्कम कुणाला दिली, हे सांगता सुद्धा येत नाही हे विशेष. त्यामुळे गेलेले पैसे अक्कलखाती जमा केली, असेच म्हणावे लागेल.


हा फेक धंदा.....

चंद्रपूरांनो सावधान,

हा फेकधंदा असून, अशा कोणत्याही लिंक शेअर करणे आणि त्यावर माहिती देणे एक प्रकारे तुम्हाला आर्थिक धोक्यात टाकू शकते. अशा प्रकारे कुणी कधीच विनाकारण कुणाला पैसे देत नसतो. तुम्ही स्वतःही अशा प्रकारचे स्टेटस ठेवून इतरांना आर्थिक संकटात टाकू नका. लिंक शेअर करणे, त्यावरील कुकीज अॅक्सेप्ट करणे. यामुळे तुमच्या मोबाइलचा कंट्रोल त्रयस्थ व्यक्तीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर तुमच्या गुगल पे, फोन पे किंवा इंटरनेट बँकिंगचा अॅक्सेस त्रयस्थाच्या हाती गेला. तर मोठे आर्थिक नुकसान संभवू शकते, असा सल्ला सायबर सल्लागारांनी दिला आहे.

होणारा व्हायरल मेसेज:-

*आपली व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस 30 पेक्षा जास्त लोकांद्वारे पाहिली जात आहे का ?? तर आपण देखील दररोज 500 रुपयांपर्यंत कमाई करू शकता!*

*Register Now..* 👇🏼👇🏼

#parttimejob #marathionlinework #verified



सायबर क्राईम विभागाचे आवाहन.
सध्या वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या माध्यमातून लोकांना आमिष दाखवून गंडवण्याचे प्रकार सुरू आहेत. कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत किंवा वेबसाईट्सवर आपली व्यक्तिगत माहिती शेअर करू नये. आधार, पॅन क्रमांक तसेच बँक अकाउंट व मोबाईलवर आलेला ओटीपी हा कोणालाही सांगू नये किंवा देऊ नये, असे आवाहन सायबर क्राईम विभागाकडून करण्यात आले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने