खड्डे बुजवून रोड सुरसुरीत करुन रस्ता बांधकामाला सुरुवात.
निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे आणि युवा वर्ग यांच्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल.
मुल:- चंद्रपूर मूल रोडवर मोठ्या प्रमाणात रोडवर खड्डे पडले होते, आणि चंद्रपूर मुल दळणवळण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत होते. अपघाताचे प्रमाण पण त्या खड्ड्यामुळे वाढलेले होते, तसेच या खड्डयांमुळे बरेच किरकोळ अपघात झाले होते, बऱ्याच दिवसापासून हे खड्डे वाहतुकीस अडचण निर्माण करत होते, .शासन व प्रशासनाच्या या खड्डा कडे लक्ष जावा,म्हणून काही दिवसा अगोदर निखिल भाऊ वाढई,प्रणित भाऊ पाल,आकाश भाऊ येसनकर,रोहित भाऊ शेंडे व युवा वर्ग स्वतः श्रमदान करून खड्ड्यावर मुरुम गिट्टी आणून टाकले व खड्डे व्यवस्थित केले. व शासन व प्रशासन ला निवेदन मार्फत कळविण्यात आले होते. की प्रशासनाने मूल येथील सर्व रोड खड्ड्यांचा बंदोबस्त केला नाही तर युवा वर्ग त्या खड्ड्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा हे उपक्रम राबवणार असा इशारा देखील दिला होता.
सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन, प्रशासनाने खड्डे बुजवून रस्ता बांधकामाला सुरुवात केली.रोड वरील खड्डे बुजवले यामुळे मूल येथील नागरिकांनी निखिलभाऊ वाढई, प्रणितभाऊ पाल, आकाश भाऊ येसनकर,रोहित शेंडे,निहाल गेडाम,आकाश घुटके,शुभम बनडीवर,सचिन बांबोळे,साहिल खोब्रागडे,सुरज गेडाम,अजय दहिवले,निखिल रायपुरे मूल -युवा वर्गाचे व प्रशासनाचे आभार मानले.