🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

घुग्गुस काँग्रेसच्या वतीने शाहिदांना श्रद्धांजली.


Bhairav Diwase.        Feb 14, 2021
चंद्रपूर:- रविवार 14 फेब्रुवारीला घुग्गुस काँग्रेसच्या वतीने पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. वीर जवानांच्या प्रतिमे समोर मेणबत्ती प्रज्वलीत करून व पुष्प वाहून श्रद्धांजली देण्यात आली. वीर जवान अमर रहे असे म्हणून दोन मिनिट मौन पाळण्यात आले.

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-काश्मीर नॅशनल हायवे वर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यातील वाहनाला विसफोटक कार ने टक्कर दिली. जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेच्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, घुग्घुस काँग्रेसचे माजी  शहराध्यक्ष जावेद सिद्दीकी, माजी सरपंच शेषराव ठाकरे,  अल्पसंख्यांक घुग्घुस शहराध्यक्ष शोएब खान, माजी सरपंच शोभा ठाकरे, जिल्हा सचिव उत्तम ठाकरे  काँग्रेस नेते गणेश उइके,  शेख शम्मूउद्दीन, शेखर तंगलपेल्ली, सचिन गोगला,  प्रशांत अट्टेला, पवन नागपुरे, युथ कांग्रेसची प्रांजलि ठाकरे, पूजा उईके, आम्रपाली वानखेडे, शशिकला पाटील उपस्थित होते.