🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दारूच्या व्यसनामुळे शाब्दिक वाद विकोपाला.

रागाच्या भरात वडिलांकडूनच मुलाचा खून.
Bhairav Diwase.         Feb 15, 2021
जळगाव:- शहरातील बालाजी पेठ परिसरात राहणार्‍या तरुणाचा बापाकडून खून झाल्याची घटना रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सौरभ सुभाष वर्मा वय २६ रा. बालाजीपेठ हे दोन भाऊ, आई-वडिलांसह राहतो. 

पपईचा ट्रक उलटून १५ मजूर जागीच ठार.

     सौरभ वर्मा याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता, अशाच पद्धतीने १२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दारू पिऊन सौरभ घरी आला. दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांचे सौरभला बोलचाल होऊन यातच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सौरभने हातातील चाकु काढून वडिलांना धमकावत होता. त्यामुळे वडिलांनी सौरभच्या हातातील चाकु हिसकावून त्याला दम दिला. 

मित्राची धडपड सुरूच होती, पण नियती कठोर झाली. 

यातच सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता, वडिलांच्या हातातील चाकु सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे शनिपेठ पोलिस ठाण्यात शरण गेले असून त्यांच्या वर कलम ३०२ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.