उपचारापूर्वीच मित्राने मित्राच्या पाठीवर सोडले प्राण.
नागपूर:- वय अवघे ४० वर्ष... कुटुंबातील कर्ता व्यक्ती... घरात पत्नी व एक लहान मुलगी... पेंटिंगचे काम करून कुटुंबाचा गाडा हाकायचा... कामावर असतानाच अचानक छातीत दुखायला लागले... परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मित्राने त्याला दुचाकीवर बसवून दवाखान्यात नेण्याची धडपड चालवली... मित्राला काही होऊ द्यायचे नाही, यासाठी प्रयत्नही खूप केले... पण, नियती कठोर झाली... रस्त्यात एक दवाखाना दिसला, पण तोही बंद होता... अखेर त्याने दुचाकीवर बसून जात असतानाच मित्राच्या पाठीवर मान टाकली अन् अखेरचा श्वास घेतला...
दारूच्या व्यसनामुळे शाब्दिक वाद विकोपाला.
मित्राने पाठीवर मान टाकल्यानंतरही त्याला कसेबसे सावरत सहकारी मित्र त्याला मेडिकलमध्ये घेऊन गेला. तोपर्यंत आपला मित्र आता या जगात नसल्याची त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे मित्राला वाचविण्याची त्याची धडपड सुरूच होती. शेवटी मेडिकलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमलेश चरणदास मेश्राम (वय ४०, रा. कृष्णधाम, मानकापूर, नागपूर) असे मृत पेंटरचे नाव आहे. मेश्राम यांना पत्नी आणि एक मुलगी आहे. याप्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर देवराव गेडाम (वय ५२, रा. हिलटॉप, सुदामनगरी, नागपूर) यांनी दिलेल्या सूचनेवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पपईचा ट्रक उलटून १५ मजूर जागीच ठार.