🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दोन कारच्या धडकेत पती-पत्नी जखमी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दोन कारच्या धडकेत पती-पत्नी जखमी होण्याची घटना भद्रावती शहरापासून जवळच असलेल्या पाॅवर ग्रीड जवळ चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

         येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामकृष्ण पोईनकर (४८) आणि त्यांच्या पत्नी कुमूद चंद्रकांत पोईनकर (४४) हे दोघेही एका कार्यक्रमाकरीता आपल्या नॅनो कार क्र.एम.एच.३४, ए.ए.९७८५ ने चंद्रपूरला जात होते.दरम्यान, पाॅवर ग्रीड जवळ चंद्रपूरकडून नागपूरकडे भरधाव जाणा-या शिवरलेट कार क्र.एम.एच.४७, सी. ७८४२ च्या चालकाचे नियंत्रण सुटले व कार दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर पोईनकर यांच्या कारला धडक दिली.त्यात पोईनकर दाम्प्त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.