🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोंढा ग्राम पंचायतीवर ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे वर्चस्व.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील कोंढा ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस प्रणित ग्रामविकास परिवर्तन पॅनलने ९ पैकी ८ जागा जिंकुन दणदणित विजय प्राप्त केला आहे.

           कोंढा येथील सामाजिक कार्यकर्ते कवडू मोरे यांच्या कुशल नेतृत्वात काॅंग्रेस प्रणित ग्रामविकास परिवर्तन पॅनलने लढविलेल्या  निवडणुकीत या पॅनलचे महेश मोरे, मंगेश मंगाम, ललिता काकडे, दीपिका चिडे, सोनाली मोरे, अरुणा राजुरकर, वैशाली काळे आणि प्रेमिला दुर्योधन हे ८ सदस्य निवडून आले. 

                दि.१२ फेब्रुवारी रोजी या सर्व सदस्यांची विशेष सभा ग्राम पंचायत सभागृहात पार पडली.यावेळी सरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महेश कवडुजी मोरे हे अविरोध निवडून आले.तर उपसरपंच म्हणून मंगेश मनिराम मंगाम हे अविरोध निवडून आले. यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून वरभे, ग्रामविकास अधिकारी जेंगठे आणि तलाठी थुल उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे यावेळी पुष्पहार घालून जल्लोशात स्वागत करण्यात आले. 

                     नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचे खा. बाळूभाऊ धानोरकर, आ.प्रतिभाताई धानोरकर, कवडुजी मोरे, देविदास गोरे, अजय मत्ते, प्रशांत पा.चिकटे, साधू पा.मत्ते, आतिश बोबडे, महेश मत्ते यांनी अभिनंदन केले आहे.