🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विद्यापीठाने विदयार्थ्यावर अन्याय केल्यास सहन करणार नाही:- सुरज पेदुलवार.


Bhairav Diwase.    Feb 11, 2021
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठातील परिक्षा या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साधारण ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे परंतु या सर्वात विद्यापीठात विदयार्थ्यांना विविध समस्यांना तोंड दयावे लागत आहे . तरी विद्यार्थ्यांसमोरील समस्या मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार सुरज पेदुलवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कुलगुरूंसमोर दि. 28 जानेवारी 2021ला निवेदनाद्वारे मांडल्या. त्याअनुषंगाने परिक्षा आवेदन स्विकारण्याची तारीख विद्यापीठाने वाढवुन दिली होती . तसेच जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना परीक्षा आवेदन पत्र भरण्याची  संधी देखील देण्यात आली....


परंतु हि संधी विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची थट्टा करणारी आहे . एल.एल.बी.तृतीय वर्षा च्या विदयार्थ्यांना परिक्षा शुल्क पाच पटीने वाढीव आकारण्यात आले आहे. दि. 10 फेब्रुवारी 2021 हि आवेदन पत्र स्विकारण्याची अंतिम तारीख असुन त्याच दिवशी विद्यार्थ्यांना साधारण १९७१ रूपये परिक्षा शुल्क आकारण्याच्या जागी सुमारे ९८५५ रूपये आकारण्यात येईल असे सांगण्यात आले हे विदयार्थ्यावर अन्याय आहे . सामान्य कुटुंबातील विदयार्थ्यांना एका दिवसात १०,००० रक्कम भरणे काही सोयीचे नाही कोरोना काळात आधीच लोकांचे जिवन कष्टदायी झाले आहे . घरची चुल चालवणे यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे . या सर्व परिस्थितीत विद्यापीठाने केलेली परीक्षा शुल्क दरवाढ ही विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची थट्टा करण्यासारखा आहे ... 

तरी विद्यापीठ हे विद्यादानाचे केंद्र असुन व्यवसाय नाही. विद्यापीठाने विद्यांर्थ्यांवर अन्याय केल्यास ते भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. त्यामुळे त्वरीत परिक्षा शुल्काची दरवाढ मागे घेवुन परिक्षा शुल्क पुर्वीप्रमाणेच आकारण्यात यावे . अशी मागणी निवेदनाद्वारे सुरज पेदुलवार, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, जिल्हा चंद्रपूर (महानगर) यांच्यातर्फे करण्यात आली आहे.