🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

गोवरी ग्रामपंचायतीवर ग्राम विकास आघाडीची सत्ता.

सौ. आशा उरकुडे यांची सरपंचपदी अविरोध निवड.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील गोवरी ग्रामपंचायत भाजप चा गड समजण्यात येत होता. मात्र काँग्रेस, शिवसेना आणि शेतकरी संघटना या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे हरिचंद्र जुनघरी, शिवसेनेचे बबन उरकुडे आणि शे. संघटनेचे चेतन बोबडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मुसक्या आवळायचा चंग बांधला आणि ग्रामविकास आघाडी स्थापन करून एकतेचे दर्शन घडविले. मागील सलग १५ वर्षापासून भाजपचा अभेद किल्ला मानल्या जाणाऱ्या गडाला सुरूंग लावून गोवरी ग्रामपंचायतवर ग्रामविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे. 
   
      निवडणूकित ग्रामविकास आघाडीचे सौ. आशा बबन उरकुडे, उमेश रघुनाथ मिलमिले, सौ. रेखा मुर्लीधर पाचभाई, सौ. निलिमा दिगांबर देवाळकर, सौ. सुरेखा मधूकर सोयाम, सौ. निलम अमोल कोसुरकर, चेतन बंडू बोबाटे, भिमराव रायमल्लू मिठ्ठूवार हे ८ सदस्य, भाजपचे २ तर अपक्ष १ असे सदस्य निवडून आलेत. साम दाम दंड भेद वापरून सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक रंगतदार करण्याचे, येन केन प्रकारे सत्ता बडकविण्याचे प्रयत्नही पडद्याआडून सुरू झालेत. आता नेमके काय घडेल अशी उत्सुकता जनतेत निर्माण झाली. मात्र सरपंच, उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत ग्रामविकास आघाडीने एकतेची मोट बांधून विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले आणि जोरदार दनका दिला. सरपंचपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्यामुळे शिवसेनेच्या सौ. आशा बबन उरकुडे यांची अविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी काँग्रेसचे उमेश रघुनाथ मिलमिले यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी निरंजन गोरे यांनी काम पाहिले. 
       
        गोवरी ग्रामपंचायतच्या नवनियुक्त सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे परिसरातील नेत्यांनी, स्थानिक जनतेनी अभिनंदन केले आहे. तर निवड झालेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच जनतेच्या विश्वासाला पात्र राहून गावात विकास कामांना गती देण्याचा संकल्प केला आहे.