🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

नगर परिषद भद्रावतीच्या स्वच्छता तपासणीत शहरातील 16 प्रतिष्ठाने अव्वल.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत शहरातील शासकीय कार्यालये,रुग्णालये,शाळा ,व्यवसायिक क्षेत्रे, हॉटेल्स ची स्वच्छता  तपासणी नोव्हेंबर महिन्यात नगर परिषदेनी पूर्ण केली. त्यामध्ये शहरातील 3 हॉटेल्स, 9 शाळा-महाविद्यालये, 7 रुग्णालये ,  1 निवासी संकुल, 6 शासकीय कार्यालये, 3 बाजार संघटना यांचा समावेश होता.

              अव्वल ठरलेल्या प्रतिष्ठाना मध्ये हॉटेल विभागात आलिशान हॉटेल, शाळेमध्ये st, Annes हायस्कूल, रुग्णालय विभाग मध्ये मिलमिले हॉस्पिटल, निवासी संकुल मध्ये जैन मंदिर , बाजार संघटनेमध्ये फिश मार्केट चा समावेश आहे .सर्वांना संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक देण्यात आला आहे .

                स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत प्रत्येक शहरातील शासकीय कार्यालये, संस्था,हॉटेल्स ची स्वच्छता विषयक तपासणी झाली. निष्कर्षानुसार गुणांक क्रमांक देण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाचा अधिका-अधिक प्रसार होऊन नागरीकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने  नगरपरिषद प्रशासनातर्फे तपासणी करण्यात येत आहे . त्यानुसार नोव्हेंबर या महिन्यात नगरपरिषद हद्दीतील विविध शासकीय कार्यालये, संस्था ,रुग्णालये, शाळा ,बाजार संघटना ,हॉटेल्सची स्वच्छता विषयक तपासणी नगरपरिषदेच्या चमू द्वारे करण्यात आली .

                  स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या निष्कर्षानुसार कार्यालय ,संस्था हॉटेल्स, स्वच्छतेच्या मापदंडा वर पात्र ठरविण्यात आले. अशा प्रतिष्ठानांना पालिकेतर्फे सर्वात स्वच्छ घोषित करण्यात आले आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.