Top News

मुल नगरपालिका हद्दीतील नियमाला बगल देऊन व्यापारी प्रतिष्ठानाचे बांधकाम केलेल्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून गुन्हा दाखल करा.

निखिल वाढई, आकाश येसनकर, सुरज गेडाम यांची मागणी.
Bhairav Diwase.        Feb 11, 2021
मुल:- बांधकाम करताना पार्किंग व्यवस्थेकरिता जागा सोडली नाही,लघुशंकेकरिता अनेक प्रतिष्ठान मध्ये व्यवस्था नाही,मूल नगरपरिषदच्या  हद्दीमध्ये व्यापारी प्रतिष्ठाणाचे बांधकाम करतांना शासनानि ठरवून दिलेल्या नियमाला बगल  दिली गेली असून कोणत्याही व्यापारी प्रतिष्ठाना समोर पार्किंग ची व्यवस्था दिसत नाही त्यामुळे ग्राहकाची वाहने रस्त्यावर राहत असल्यामुळे अपघात होऊ शकतो आणि पायदळ चालणाऱ्या पादचारी नागरिकांना नाहक  त्रास होत  आहे अनेक व्यापारी प्रतिष्ठानामध्ये  महिल्यांच्या लघुशंके करिता व्यवस्था नाही या गोष्टीची तात्काळ चौकशी करून नियमाला बगल देऊन बांधकाम करणाऱ्या आणि व्यवस्था नसलेल्या प्रतिष्टानावर नगरपरिषद मूल ने तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करून   गुन्हे दाखल करण्यात यावे करिता युवा वर्ग तर्फे  आपणास निवेदन देत आहोत जर चौकशी करून  कारवाही नाही झाली तर युवा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन मार्फत दिला निवेदन देतांना निखिल वाढई ,आकाश येसनकर,सूरज गेडाम,रितीक शेंडे,साहिल खोब्रागडे,साहिल मेश्राम,सुरज भेंडारे,निहाल गेडाम, कुणाल चिकाटे,अंकुश बट्टे तसेच मूल मधील अनेक युवा उपस्तीत होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने