🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

तीन एकरातील गहू आणि चण्याचा ढिग अज्ञात इसमाने जाळला.


Bhairav Diwase.        Feb 22, 2021
(संग्रहित छायाचित्र)
कोरपना:- कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने तीन एकरातील गहू आणि चणा या पिकाची कापणी करून शेतातच ढिगारा रचून ठेवला होता. अज्ञात इसमाने आग लावून हा ढिगारा जाळला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये शेतकऱ्याचे १ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषी इसमावर कार्यवाही करण्याची मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.

लखमापूर येथे दादाजी सीताराम पाचभाई यांचे शेत आहे. त्यांनी यावर्षी रबी हंगामात गहू आणि चणा पीक घेतले होते. पिकाची कापणी करून शेतातच ढिगारा रचून ठेवला होता. थ्रेशर मिळताच मळणी करण्याचा शेतकऱ्याचा बेत होता. मात्र, रात्री आग लागल्याचे कळताच शेतात धाव घेऊन पाहणी केली असता तीन एकरांतील गहू व चणा जळून खाक झाला होता.

हाताशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत