🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चितळाची दुचाकीस धडक; बाप लेक जखमी.

Bhairav Diwase. Feb 10, 2021

पोंभुर्णा:- बाहेरगावावरून स्व गावी दुचाकीवर येत असताना 08 फेब्रुवारी सायंकाळच्या सुमारास नांदगाव ते जूनगाव रस्त्यावर चितळा ने दुचाकीस धडक दिल्यामुळे जुनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी जखमी झाला असून त्याचेवर सावली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडीला सोबत असलेला 13 वर्षीय मुलगा हा सुद्धा जखमी झाला असून त्याच्याही तोंडाला व पायाला मार आहे.

याबाबत सविस्तर असे की जुनं गाव येथील रवींद्र भगवान चुधरी हे मूल तालुक्यातील बेंबाळ येथे नातेवाईकांच्या लग्न निमित्य गेले होते लग्न आटोपून परत येत असताना नांदगाव ते जून गाव रस्त्यावर चितळाने आकस्मिक रस्त्यावर धाव घेतली व तेवढ्यात दुचाकी चितळा ला धडक बसली. या अपघातात रवींद्र चुधरी व त्याचा मुलगा हे दुचाकी वरून खाली कोसळले रवींद्र याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना नांदगाव येथे प्राथमिक उपचारानंतर सावली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दिनांक 08 फेब्रुवारी रोजी घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबावर घरचा कमावता व्यक्ती जखमी झाल्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. वन विभागाने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून जखमी अल्पभूधारक शेतकऱ्याला शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.