🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

गळफास घेत प्रेमीयुगलाची आत्महत्या.


Bhairav Diwase.      Feb 10, 2021
जिवती:- भारी येथील प्रेमयुगलाने एकाचवेळी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जिवती तालुक्यातील भारी पोलीस ठाणे हद्दीतील सिंगरायगोंदी येथे मंगळवारी उजेडात आली.

      रमेश कोटनाके रा.सिंगरायगोंदी व कविता मडावी रा.चोपणगुडा अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, रमेश कोटनाके आणि कविता मडावी यांचे प्रेमसंबध होते. ते दोघेही सोमवार संध्याकाळपासून घरून बेपत्ता झाले होते. कुटुंबियांनी दोघांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. मंगळवारी सिंगराय-गोंदीलागतच्या जंगल परिसरात एक झाडाला दोघांचेही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती भारी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे, दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती आहे, आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या घटनेचा पुढील तपास भारी पोलीस करत आहेत.