बल्लारपूर:- बल्लारपूर-सास्ती वेकोलीच्या ओपन कास्ट मध्ये सकाळच्या पाळीत ड्युटीवर आलेल्या वेकोली कर्मचारी अक्षय खरतड रा.बल्लारपूर यांचा सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास अपघात घडला. यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सूत्राच्या माहितीनुसार डम्पर पलटल्यामुळे सदर अपघात घडल्याची माहिती आहे. अपघात घडल्याची माहिती उशिरा मिळाल्याची माहिती वेकोली प्रबंधन यांनी दिली. कोळसा खाली करतांना सदर अपघात घडल्याची माहिती असून गाडी मागे घेतांना गाडी खोल खड्डयात पडल्यामुळे झालेल्या अपघातात कर्मचारी अक्षय खरतड यांचा मृत्यू झाला आहे.