कोवीड नियंत्रणात महत्वाच्या केंद्रस्थानातील नागभीड येथील दरजोन्नतीने मंजूर उपजिल्हा रुग्णालय बांधकामास अत्यावश्यक निधी विशेष बाब प्राधान्याकमाणे उपलब्ध करून घ्यावा.

आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मागणी.

भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडून आश्वासन.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्राच्या नागभीड ग्रामीण रुग्णालयास दरजोन्नतीच्या जुन्या व्यवहार्य मागणीवर १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे. मौजा नागभीड ला तालुका स्थान असून नागपूर-चंद्रपूर ,नागपूर -वडसा,नागपूर -गडचिरोली महामार्ग आणी चंद्रपूर-भंडारा च्या मध्यभागी व जिल्ह्यात एकमेव नॅरोगेज -ब्रॉडगेज रेल्वे जंक्शन तसेच ४० हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या नगरपरिषद स्थानी 'अ' दर्जा ग्रामीण रुग्णालयास शासनाने दरजोन्नतीने १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे.
          घोडाझरी ब्रिटिश कालीन निर्मित जलाशय सफारी व वाघ्र प्रकल्पात येणाऱ्या देशी -विदेशी पर्यटकांचा ओध वाढतांना नागभीड येथील वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असून ,नागपूर व चंद्रपूर च्या शसकीय वैद्यकीय महाविद्यालय समान ११० किमी अंतरामुळे अत्यवस्थ रुग्ण दगावण्याच्या घटना वाढल्याने सन २००१ च्या लोकसंख्या आधारित आरोग्य संस्था स्थापना मूळ बृहद आराखडा  अहवालानुसार मा.प्रधान सचिव सार्व आ.विभाग मंत्रालय यांस दि.२० जाने १६ च्या श्रेणीवर्धन प्रस्तावास महा.शासन सार्वजनिक आरोग्य  विभागाने दि.२४.०८.२०१८ रोजी उपजिल्हा रुग्णालय केले.
   अधीक्षक अभियंता ,सा. बा. मंडळ चंद्रपूर द्वारा सार्वजनिक आरोग्य विभाग दि.२० ऑगस्ट १९ रोजी ४५७७.७९ ,लक्ष सादर बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रलंबित असतांना मा.मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशन -१९ चंद्रपूर जिल्हा आढावा बैठकीस राष्ट्रीय महामार्गवर अत्यावश्यक वैद्यकीय  सेवा अंतर्गत मंजुरी व बांधकाम आश्वासन दिले होते.
        कोविड -१९ मध्ये नागभीड उपजिल्हा रुग्णालय महत्व असून बांधकाम होण्यास चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची अनेक पत्रव्यवहार झाली आहे वित्त विभागकडून निधी वितरण प्राधान्यक्रम प्रलंबित असल्याने परीसरातील रुग्णांच्या आरोग्य सेवेअभावी गैरसोय व अडचणी वाढत आहेत.
   नागभीड उपजिल्हा रुग्णालय बांधकामास ४५७७.७९ लक्ष अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसह आवश्यक वैद्यकीय अधिकारी नेमणुकीच्या मा.मुख्यमंत्र्याच्या आश्वासन पुर्ततेस मा.वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचेकडे आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी मागणी केली आहे सदर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना दिले या मागणीवर आमदार बंटीभाऊ यांनी प्रत्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेत चर्चा केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या