गडचिरोली:- गडचिरोलीमध्ये जवानांसोबत झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. खोब्रामेंढा जंगलात गेल्या 3 दिवसांपासून गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडोमध्ये चकमक सुरू आहे. आज जवानांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले.
घटनेची मुळ छायाचित्र.....
👇👇👇👇👇👇👇
शस्त्र साठा जप्त.....
खोब्रामेंढा जंगलात आज सकाळपासून माओवादी आणि सी सिकस्टी कमांडोमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत पाच माओवाद्याना कंठस्नान घालण्यात सी-60 कमांडोना यश आले. मृतक माओवाद्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुष माओवाद्याचा समावेश आहे. घनदाट जंगल असलेल्या या भागात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. तीन दिवसांपासून या भागात जवानांचं अभियान सुरू असून माओवाद्यांचं शिबीर उद्ध्वस्त केल्यानंतर जवानांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू होते.