Top News

महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपुर (ग्रा) जिल्हा कार्यकारणी घोषित.

जिल्हाध्यक्षपदी सचिन शेंडे तर जिल्हाउपाध्यक्ष पदी लक्ष्मण गव्हारे यांची निवड.
Bhairav Diwase. March 29, 2021
चंद्रपूर:- महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग अंतर्गत चंद्रपुर ग्रामीण जिल्हाकरिता युवा आघाडी विभागीय सचिव तुलसीदास भुरसे यांचे शिफारसी नुसार चंद्रपुर दक्षिण (ग्रा) जिल्हा पदाधिकारी निवड करण्यात आली असून सचिन मोरेश्वर शेंडे यांची यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्ययत आली.
    महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा राज्य अध्यक्ष तथा खासदार रामदास तड़स महासचिव डॉ, भूषण कार्डिले, राज्य सहसचिव बळवंतराव मोरघडे, राज्य सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाले, प्रसिद्धि प्रमुख दिलीप चौधरी यांचे सूचनेनुसार चंद्रपुर विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े, सचिव संजय खाटीक, राज्य उपाध्यक्ष चंद्रपुर विभाग विपिन पिसे व युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे मार्गदर्शनानुसार युवा आघाडी विभागीय सचिव तुळशीदास भुरसे यांनी जिल्हाध्यक्ष पदाकरिता सचिन मोरेश्वर शेंडे, कार्याध्यक्षपदी भाऊराव नकटू कोठारे, सचिवपदी मनोज यादव बेले, सहसचिव पदी अनिल विठल खनके, जिल्हाउपाध्यक्ष पदी लक्ष्मण गोसाई गव्हारे, व कोषाध्यक्षपदी प्रवीण मारोती धोंडरे यांची शिफारस केली. निवड झालेले नवनियुक्त पदाधिकारी हे ओबीसी संघटनेच्या कार्यसोबत सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमात हिरी हिरिने भाग घेत असतात त्यांच्या याच कार्याची दखल घेत तेली समाज संघटन मजबूत करण्याच्या उदेशने राज्य सह सचीव बलवंत मोरघडे यांच्या सूचनेनुसार विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े यानी चंद्रपुर दक्षिण जिल्हा पदाधिकारी निवड केली.
       
         त्यांचे नियुक्ती बद्दल दत्ता तड़स, निलेश बेलखेड़े, प्रितम लोंनकर, सूरज कारेमोरे, उमेश हिंगे, रामेश्वर चातुर, लक्ष्मण वासेकर, कवडू लोहकरे, धीरज लाखडे, राहुल भांडेकर, निकेश नैताम, किर्ति कातोरे, वंदना डांगरे, भावना बावनकर, यांनी अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने