बैलबंडीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार.
सोमवार, मार्च २९, २०२१
0
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- बैलबंडीला धडक देऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ऐन होळीच्या दिवशी २८ मार्च रोजी रात्री ८.५० वाजताच्या दरम्यान विंजासन-केसुर्ली रस्त्यावर घडली.
मारोती बाजीराव किन्नाके (२५) रा. विंजासन भद्रावती असे मृतकाचे नाव असून तो मजुरीची कामे करायचा. घटनेच्या दिवशी तो भद्रावतीकडून केसुर्लीकडे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.३४ ८४६२ ने जात असता रस्त्यात विरुद्ध दिशेने येणा-या बैलबंडीला त्याच्या दुचाकीची धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की मारोती जागीच ठार झाला. तर बैलही जखमी झाले. या घटनेची पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याच्या भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे किन्नाके परिवारावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.