रुग्णालयातील शौचालयात आढळले ७ महिन्याचे भृण (मृत बालिका).


Bhairav Diwase.   March 01, 2021
चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर उपजिल्हा रूग्णालयात सात महिण्याच्या नवजात बाळाला शौचालयात टाकून ठार मारण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. सफाई कामगार रूग्णालयातील शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी गेला असता त्याच्या हा प्रकार लक्षात आला. सफाई कामगाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात तपासाला सुरूवात केली आहे. थरकाप उडविणारी आणि काळीज हेलविणा-या घटनेने समाज मन सुन्न झाले आहे. सात महिन्याचे बाळ ही मुलगी असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ही भ्रुणहत्येचा प्रकारही असू शकतो असा संशय निर्माण होत आहे.

DNR या खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये 20 वर्षीय तरुणीचा बस वाहकाने केला विनयभंग.


एका प्रेमी युगलांनी केली रेल्वे रुळावर आत्महत्या. 


चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात आज सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास दररोज प्रमाणे सफाई कामगार राजेश सुबराव शेट्टी शौचालयातील स्वच्छता करण्याकरिता गेला असता त्याला शौचालयात नवजात बाळ आढळून आले. रूग्णालयातचा हा प्रकार आढळून आल्याने तो घाबरला आणि त्याने लगेच रूग्णालयातील वैद्यकीय अधिका-याला सदर घटना सांगितली. वैद्यकीय अधिका-यांनी शौचालयात जावून पाहणी केली असता बाळ मृतावस्थेत होते. त्यांनतर फिर्यादी राजेश सुबराव शेट्टी (सफाई कामगार) याचे तक्रारीवरून चिमूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात 318 भादवी अन्वये गुन्हा नोंद दाखल केला आहे. रूग्णालयातच नवजात बाळाला ठार करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवजात बाळाला ठार करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बाळाला शौचालयात टाकण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच बाळ हे मुलगी असल्याने भ्रुणहत्या म्हणूनही या घटनेनेकडे बघितल्या जात आहे. तसेच अनैतिक संबंधांतील बाळ जन्मास आले असावे त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असाही संशय पोलिस घेत आहेत.

चिमूर मध्ये उपजिल्हा रूग्णालयात संबंध तालुक्यातील महिला पुरूष उपचारासाठी येतात. तसेच या ठिकाणी महिलांच्या प्रसुतीही केल्या जातात. परंतु रूग्णालयातच मातेने बाळाला ठार केले की अन्य व्यक्तीने ठार करून शौचालयात टाकले या विविध पैलूंनी पोलिस तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पो अधिकारी बगाटे योच नेतृत्वात सपोनि मंगेश मोहोड, पीएसआय गायकवाड तपास करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या