Top News

ॲड. चंद्रकांत निमजे यांचा डोंगेघाटात बुडून मृत्यू.


Bhairav Diwase.     March 30, 2021
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी येथील नामांकित वकील ॲड. चंद्रकांत निमजे वय 43 हे आज सकाळी घरून निघाले फिरत फिरत ब्रह्मपुरी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगे घाट या ठिकाणात आले व आंघोळीची इच्छा झाल्यामुळे कपडे काढून पाण्यामध्ये उतरले परंतु बरोबर पोहता येत नसल्यामुळे पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला.

         सायंकाळच्या सुमारास नियमित पोहायला येणारे लोक सायंकाळी पाच वाजता डोंगेघाटावर आले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला त्यावरून या घटनेची माहिती झाली पोलिस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस लोक या ठिकाणी येऊन पंचनामा केला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहे घटनास्थळी ब्रह्मपुरी चे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे पो.ह. अरूण पिसे व इतर कर्मचारी घटनास्थळी घटनास्थळी उपस्थित झाले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने