Top News

भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पदी मनोज आत्राम यांची निवड.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- बिरसा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष मनोज आत्राम यांची भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
     मनोज आत्राम हे अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटनेशी जुळलेले आहे त्यांच्या  कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बंडू मडावी यांनी शिफारस केली होती त्यादृष्टीने भारतीय मानवाधिकार असोसिएशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष पांडुरंग नरवाडे यांनी  मनोज आत्राम यांना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त केले आहे.
    भारतीय मानवाधिकार असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बंडू मडावी, राज्य संघटक हेमंत उंदीरवाडे, सचिव रमेश आडे, संघटक निळकंठ साळवे, पेंदाम आदींनी आत्राम यांची भेट घेऊन नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे त्यांचे निवडीबद्दल सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने