वरोरा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत दरोडा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.   March 20, 2021
वरोरा:- वरोरा तालुक्या पासून 14 किमी अंतर असलेल्या टेमुर्डा येथे काल दि. 19/03/2021 च्या मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. प्राथमिक माहिती नुसार अज्ञात दरोडेखोर यांनी बँकेची मागची खिडकी गॅस कटरने कापून बँकेत प्रवेश केला.
सकाळी नागरिकांना बॅंकेची खिडकी तुटली दिसली तर त्यांनी सदर घटनेची सूचना पोलिसांना दिली. बँकेतून किती पैसे चोरीस गेले अजून कळू शकले नाही. घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद  झाली असेल तर पोलिसांना तपास मध्ये मदत होईल. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कसून तपास सुरू आहे.