Click Here...👇👇👇

गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी गजानन जुमनाके यांची निवड.

Bhairav Diwase
अल्पसंख्यांक सेल प्रदेशाध्यक्ष पदी अब्दुल जमीर अब्दुल हमीद तर प्रदेश प्रवक्ता पदी महेबूब शेख.

बापूराव मडावी यांची जिल्हाध्यक्ष पदावर फेर नियुक्ती.

नामदेव शेडमाके प्रदेश महामंत्री तर भास्कर तुमराम यांची प्रदेश संघटक पदावर वर्णी.
Bhairav Diwase.     March 08, 2021
राजुरा:- देवाळा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक नवनियुक्त गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांची गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्याध्यक्ष पदी तर अब्दुल जमीर अब्दुल हमीद यांची अल्पसंख्यांक सेल प्रदेशाध्यक्ष पदी, महेबूब शेख यांची प्रदेश प्रवक्ता पदी निवड करण्यात आली. 

या प्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हरीश उईके, प्रदेश उपाध्यक्ष सुखलाल मडावी, प्रदेश कोषाध्यक्ष महेश बमनोटे, प्रदेश संघटक विठ्ठल उईके, नागपूर जिल्हाध्यक्ष धनराज मडावी, वर्धा जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन मसराम, राजुरा विधानसभा अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंग जाधव, जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी, बाजार समिती संचालक निशिकांत सोनकांबळे, जेष्ठ नेते ममताजी जाधव, भिमराव पाटील जुमनाके, माजी सभापती भिमराव पाटील मेश्राम, प्रदेश प्रवक्ता महेबूब शेख, नगरसेवक मारोती बेल्लाळे,अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष मुनीर सय्यद, अनंत बेल्लाळे, राजुरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष फारुख शेख, हनुमंत कुमरे, अरुण उदे, संजय सोयाम, सुधाकर कूसराम, नानाजी मडावी, गजानन पाटील पंधरे सह बहुसंख्खेने कार्यकर्ते उपस्थित होते. 

बैठक यशस्वी करण्याकरिता वसंत आत्राम, शंकर मडावी, जाहीर शेख, प्रभाकर चेन्नुरवार, भारत मेश्राम, अब्दुल माजीद, गुलाब मेश्राम, सुभाष मडावी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.