जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव येथील महिलांनी केला गावाला स्मार्ट ग्राम करण्याचा संकल्प.
कोरपना:- तालुक्यातील वडगाव येथील जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी सरपंच मोहपतराव मडावी यांनी महिलांनी ग्रामविकासाठी प्रयत्न करावे. गावाला स्मार्ट ग्राम करण्यासाठी एकजुटीने काम करावे तसेच लघुउद्योग आणि स्वयंचालीत व्यवसाय स्थापन करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला सर्वांगीण विकास करावा असे प्रतिपादन केले.
या वेळी उपसरपंच सुभाष राऊत, माजी उपसरपंच तथा सदस्य शंकर मोहितकर, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्या सौ. वच्छला कुळमेथे, ग्रामपंचायत सदस्या सौ. गोदाबाई किन्नाके, ग्रामपंचायत सदस्या सौ. छायाताई टोंगे, ग्रामपंचायत सदस्याi प्राप्तीताई पानपट्टे, ग्रामसेवक सौ. धात्रक मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. मालताताई पावडे, अंगणवाडी सेविका शारदाताई गुरुनुले, ममताताई पिंगे, चंद्रकलाताई मडावी पेसा अध्यक्ष, मोबिलायझर अस्मिता मडावी तथा गावातील बहुसंख्खेने महिला उपस्थित होत्या.