चरूर (धा) येथे युवकांनी स्वयंस्फुर्तिने केले रक्तदान.

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोविड-१९ मुळे राज्याच्या रक्तपेढित उद्भभवलेली रक्ताची कमतरता व ती कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा वर्गाला केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याकरीता नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व विरांगना मुक्ताई  क्रिडा मंडळ चरूर (धा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला बहुसंख्य युवकांनी स्वयंस्फुर्तीने प्रतिसाद दिला.

             दि. ७ मार्च रोजी चरुर (धा.) येथील आदिवासी माना जमात समाज भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात  कोविड -१९ मध्ये  योद्धा म्हणून मदत करणा-या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. शिबिरात अनेक  युवकांनी स्वयंस्फुर्तिने रक्तदान केले. शिबिराच्या  अध्यक्षस्थानी   चंदनखेडा ग्रा.पं.सदस्य बंडू निखाते हे  होते.उद्घघाटक म्हणून ग्रा.पं.सदस्या आशा नन्नावरे, प्रमुख अतिथी म्हणून चंदनखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते, माधवराव महाराज युवा बहुउद्देशीय संस्था चरूर (धा)चे अध्यक्ष  दिवाकर श्रीरामे , ललीता गेडाम, शालिनी केदार, वर्षा ठाकणे,कोमल ढोक ,संगिता धुबडे,हरिदास कारमेंघे,सिंगलदिप , संजय गावित, अमोल गिट्टेवार, योगेश जारोंडे, लक्ष्मण नगराळे, रूपेश घुमे उपस्थित होते.

                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक  नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आशिष हनवते यांनी केले. संचालन नंदकिशोर जांभुळे यांनी, तर आभार  विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक महेश केदार  यांनी मानले . शिबिराच्या यशस्वितेसाठी, अमोल दडमल, रोहित केदार, अमर श्रीरामे, शरद केदार ,तुषार झाडे,मयुर जांभुळे,शुभम चौधरी, राहुल केदार , आशिष डुकसे ,कुणाल ढोक,प्रणित हनवते, गजानन नन्नावरे, गायत्री श्रीरामे ,पुजा गायकवाड,प्रतिभा श्रीरामे, माधवराव महाराज युवा बहुउद्देशीय संस्था चरूर ,आ.मा.ज.विद्यार्थी युवा संघटना चरूर व गोंडी धर्मिय आदिवासी एकता संघटना चरूर (धा) यांनी  विशेष सहकार्य  केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)