गोंडपिपरी:- आष्टी-गोंडपीपरी मार्गावर नवेगाव (वाघाडे) जवळ दि.6 मार्च) रोजी 11 वाजताच्या सुमारास पीक अप आणि हायवात अपघात झाला ह्यात हायवा चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. झाले असे की, हायवा क्रमांक MH 34 B G 0998 राजुरा येथून विट्ठलवाडाकडे येत असताना नवेगाव जवळ पीक अप वाहन क्र. MH 40 CD 0029 ह्याच्यात जोरदार टक्कर झाली टक्कर एवढी जोरदार झाली की दोन्ही वाहनांची दिशाच बदलली आणि हायवा चालकाने मार्गालगत असलेल्या एका शेतात हायवा घातल्याने उभे असणारे गहू पीकाचे नुकसान झाले आहे. सामोरा समोर टक्कर झाल्याने यात दोन्ही वाहनाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. हायवा चालकांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने जखमीला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचाराकरिता नेण्यात आले असून पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहेत.
हायवा आणि पीक-अपची समोरा-समोर धडक; हायवा चालक गंभीर जखमी.
शनिवार, मार्च ०६, २०२१