गडचिरोली:- छत्तीसगड येथे नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षक जवान यांच्यामध्ये शुक्रवारी चमकम झाली. यामध्ये भिवापूर येथील जवान मंगेश हरिदास रामटेके (४०)यांना विरमरण आले. मंगेश यांच्या मृत्यूमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली असून आज बंद पाळण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सी - ६० कमांडो आणी नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. या दरम्यान गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड येथील नारायणपूरमध्ये कार्यरत ईंडो तिबेट बॉर्डर पोलिसमधील ( ITBP ) हेड काँन्सटेबल मंगेश हरिदास रामटेके ( ४० ) यांना विरमरण आले.
नक्षल्यांनी पेरुन ठेवलेल्या भुसुरुंगाचा स्फोट झाल्याने त्यात ते शहीद झाले. सिद्धार्थ नगर परिसरात राहणारे शहिद मंगेश रामटेके हे २००७ साली आयटीबीपी मध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी, सात वर्षांचा मुलगा, आई - वडिल दोन बहिणी व एक भाऊ आहे. शहीद मंगेशचे पार्थिव आज भिवापुरात आणण्यात येणार असून दुपारनंतर येथील घाटावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.