Click Here...👇👇👇

प्राचार्याची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी आणि पालक उतरले रस्त्याव.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील चांदा आयुध निर्माणीतील आयुध निर्माणी हायस्कुलचे प्राचार्य एम.रंगा राजू यांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीकरीता विद्यार्थी आणि पालकांनी हायस्कुलसमोर निदर्शने केली. 

            आयुध निर्माणी हायस्कुलचे प्राचार्य एम.रंगा राजू आणि इतर सहाय्यक शिक्षक यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. अनेकदा पोलिस तक्रारीही झाल्या. प्राचार्य राजू हे शिक्षकांना विनाकारण मानसिक त्रास देतात असा आरोप करुन त्यांची वरीष्ठांकडे तक्रारही करण्यात आली होती.दरम्यान, दि.१९ मार्च रोजी आयुध निर्माणी बोर्डाने तडकाफडकी प्राचार्य राजू यांच्या बदलीचा आदेश काढला.तसेच त्यांना तात्काळ मुक्तही केले. त्यासोबतच ३ शिक्षकांचीही बदली झाली. परंतू राजू यांची बदली रद्द करण्यात यावी ही मागणी घेऊन काही पालक हायस्कुलच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले व त्यांनी शाळेत जाऊ नका असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी हातात ' वुई वान्ट रंगा राजू सर', 'प्राचार्य सरांची बदली रद्द करा' असे नारे लिहिलेले फलक हाती घेतले होते.तसेच पालकांनीही घोषणाबाजी केली.यावेळी व्यवस्थापनाकडून पालकांना समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र पालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. शाळेची वेळ संपल्यानंतर सर्व पालक,विद्यार्थी व शिक्षक घरी निघून गेले.त्यानंतर आयुध निर्माणीच्या तपासणी नाक्यावरुन आयुध निर्माणीच्या बाहेरील नागरिकांना हायस्कुलकडे जाण्यास मनाई करण्यात आली.दरम्यान,दि.२२ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता  तपासणी नाक्याजवळ धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.