Click Here...👇👇👇

काठीने मारून मुलाने केला वडिलांचा खून.

Bhairav Diwase


चिमूर:- चिमूर तालुक्यातील चक लोहारा येथे रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यावर बांबू च्या काठीने प्रहार करून खून केला असल्याची घटना शंकरपूर पोलिस चौकीअंतर्गत येणाऱ्या चक लोहारा येथे बुधवारी (ता. ३) रोजी घडली सिद्धार्थ रामदास सवाईकर (वय ४९) असे मृत वडिलांचे, तर सुखदेव सिद्धार्थ सवाईकर (वय २०) असे मुलाचे नाव आहे.

कुटुंबीयांशी पटत नसल्याने सिद्धार्थ सवाईकर हे मागील अनेक वर्षांपासून समाज मंदिरात वास्तव्यास आहेत. वडील व मुलांचे वादात मुलाने वडिलांच्या डोक्यावर बांबूने प्रहार केला. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.