प्रतीक्षा, सायली व हिमांशू ठरले चित्रकला स्पर्धेतील मानकरी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- नेहरु युवा केंद्र चंद्रपूर आणि विरांगणा मुक्ताई क्रीडा मंडळ चरुर(धा.) यांच्या संयुक्त विद्यमाने  जल शक्ती अभियाना अंतर्गत 'कॅच द रेन' या विषयावर  चंदनखेडा येथील नेहरु विद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. 
      
            यामध्ये प्रथम क्रमांक प्रतीक्षा मनोहर रंदये, द्वितीय क्रमांक सायली संजय वाकडे आणि तृतीय क्रमांक हिमांशू महेंद्र पराते यांना प्राप्त झाले. विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. पाण्याचे महत्व समजून इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी 'कॅच द रेन 'या शीर्षकाखाली  रेन वाटर हार्वेस्टिंग, शोष खड्डा, वनराई बंधारा, शेततळे (हौद) इत्यादी संकल्पना व पाण्याचे महत्व समजावे या हेतूने सदर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर चित्र ड्रॉईंग शीट वर काढण्याचे आवाहन  नेहरू युवा केंद्र चंद्रपूरचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आशिष सुरेश हनवते  व विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर (धा)  चे अध्यक्ष महेश वामन केदार  यांनी  केले होते. स्पर्धेविषयी योग्य असे मार्गदर्शन व  यशस्वीतेकरिता चित्रकला शिक्षक नरेंद्र आस्कर नेहरू विद्यालय चंदनखेडा यांनी मोलाचे सहकार्य केले.