संतोष निंबाळकर अ. भा. पंच परीक्षा उत्तीर्ण.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील द्रौणाचार्य क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव तथा खो-खो चे नामांकीत खेळाडू संतोष गणपतराव निंबाळकर यांनी खो-खो खेळातील  अ.भा. पंच परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली. 

            संतोष निंबाळकर हे मागील २५ वर्षापासून खो-खो या खेळात सक्रीय आहेत. अनेकदा त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच विदर्भस्तरिय सामन्यांत पंच म्हणूनही काम केले आहे. खो-खो फेडरेशन आॅफ इंडियाने दि.९ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित केलेल्या पंच परीक्षेत संतोष निंबाळकर यांनी नागपूर केंद्रावरुन परीक्षा दिली होती. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.