कुरखेडा:- कुरखेडा-कोरची मार्गावर लेंढारी नाल्यावरील मोठ्या पूलावरून कार खाली लगत असलेल्या जुन्या निर्लेखित करण्यात आलेल्या लहान पूलावर कोसळली. मात्र या अपघातात सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही. कारचा समोरील भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. ही घटना लेंढारी नाल्यावर मंगळवारला घडली.
विद्यार्थ्यांनी परीक्षेचे पेपर सोडवले जंगलात बसून.
https://www.adharnewsnetwork.com/2021/03/blog-post_38.html?m=1प्रेमीयुगलांचा निर्मनुष्य ठिकाणी वावर वाढला? पालकांनीही दक्ष राहणे गरजेचे.
https://www.adharnewsnetwork.com/2021/03/blog-post_56.html?m=1
कुरखेडा येथील व्यावसायिक जयगोपाल पालीवाल हे मंगळवारला सकाळी एकटेच कार (एमएच ३१ डी. सी. २३४७) या वाहनाने कुरखेडावरून कोरचीकडे जात होते. दरम्यान, ९. ३० वाजताच्या सुमारास लेंढारी येथील मोठ्या पुलावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार हवेत सूर मारत १० ते १५ मीटर अंतर असलेल्या खाली जुन्या लहान पुलावर कोसळली.
या अपघातात दैव बलवत्तर म्हणून कारचालक जयगोपाल पालीवाल याना किरकोळ जखम झाली. अपघाताची माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला.