(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, नवी दिल्ली द्वारे दिला जाणारा "भारत ज्योती अवॉर्ड" मा. ॲड. वामनराव चटप साहेब यांना जाहीर झाला असून दिनांक ०९ एप्रिल २०२१ रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने ओबीसी समन्वय समिति राजुरा तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ओबीसी समन्वय समिति चे उत्पल गोरे, केतन जुनघरे,सूरज गव्हाने,प्रतिक कावळे,वैभव अडवे,चेतन सातपुते,निलेश बोंसुले,ऋतिक बुटले,सुमित पायपरे आदि उपस्थित होते.