कोळसा खाण परिसरात मोठा अपघात; 4 जण गंभीर जखमी.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात कोळसा खाण परिसरात मोठा अपघात झाला आहे. गोवरी खाण क्षेत्रात हजेरी कार्यालयात अनियंत्रित अजस्त्र डंपर घुसला. या अपघातात एकूण 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

या कार्यालयात कामगार आणि अधिकारी विविध कामासाठी एकत्र आले होते. ही इमारत लोखंडी रॉडचा वापर करून तयार केली होती. प्राथमिक माहितीनुसार 2 अधिकारी 2 कामगार या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी प्रशासनाकडून धावपळ करण्यात आली. जखमींमध्ये प्रभाकर चन्ने, जे. पी. महतो, हे कामगार तर कौशलेंद्र प्रसाद, मनीष साखरे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या डंपर घटनास्थळावरून हटविण्यासाठी कारवाई सुरू झाली आहे. या अपघाताचा वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड व्यवस्थापनाच्या वतीने प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कोळसा खाण परिसरात काम करणाऱ्या कामगारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.