भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाने दिली महामानवास मानवंदना.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:-:भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते.भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया,शाखा भद्रावती ने ही उत्साहपूर्ण वातावरणात उत्साहाने महामानवास मानवंदना दिली.

आंबेडकर चौकातील महामानवाच्या पुतळ्यास फुलांनी आकर्षक सजविन्यात आले होते. निळे तोरण, झेंडे, बॅनर्सनी परिसर सुशोभित केला होता. सामाजिक अंतर राखून व मुख पट्टी लावून हजारो चाहत्यां बरोबरच भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे केंद्रीय महासचिव नागेंद्र चटपल्लीवार, जिल्हा महासचिव सुनील रामटेके,तालुका अध्यक्ष जितेंद्र गुलानी, तालुका सचिव मनीष नगराळे,शहर अध्यक्ष सरफराज खान पठाण यांनी महामानवास मानवंदना दिली. भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ने याप्रसंगी उपस्थितांना मिठाई वाटप करून गोड दिवसाची गोड सांगता केली. नंतर जनसंपर्क कार्यालय भद्रावती येथेही महामानवास फोरम तर्फे मानवंदना देण्यात आली व महामानवाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.