(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- सातशे तलाव आणि सातशे विहिरींचा ईतिहास असलेल्या भद्रावती नगरीला पाण्याची आज पर्यंत कधीच टंचाई जाणवली नाही. अख्ख्या महाराष्ट्राला टँकरने पाणी पुरविण्याची गरज पडली. शेजारच्या चंद्रपूर व वरोऱ्याला पाण्यासाठी टॅंकरची वाट पहावी लागत असे, पण भद्रावती याला अपवाद होते. परंतु यावर्षी भद्रावतीही जलवाहिनी आटल्यामुळे टंचाईग्रस्त आहे. नगर प्रशासनाला सुद्धा भद्रावती शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना व वाटसरूंना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या एकलव्य युवा संघटना व टायगर ग्रुप भद्रावतीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्दळीचे ठिकाण असलेले नवीन बस स्थानक परिसर व गांधी चौक परिसर येथे दोन तृष्णा तृप्ती केंद्र (पाणपोई) मराठी नव वर्षाच्या दिनी उद्घाटन करून लोक सेवेसाठी समर्पित केले.
या प्रसंगी भद्रावती नगरपरिषद अध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, प्रीतम देवतळे अध्यक्ष एकलव्य युवा संघटना, वैभव मेश्राम उपाध्यक्ष एकलव्य युवा संघटना, टायगर ग्रुपचे रुपेश भाऊ मांढरे, कृष्णा भाऊ तुरानकर,अथर्व भके, अभिषेक कुबडे, प्रफुल बोरकर, दीपक कुळमेथे, विकास सोनुले,फाल्गुन लांबडे, कबीर देवगडे, सौरभ पिसोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.