तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील दमदार कारवाई; जनतेकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- दिनांक 14/04/21 रोजी पहाटे गस्ती दरम्यान आठ हायवा टिप्पर गाड्यांमधून अवैध रेती वाहतूक करीत असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून तात्काळ किन्ही फाटा या ठिकाणी सदर आठ ही हयवा ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ओवरलोड रेती वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. नमूद सर्व वाहनांच्या वजन काटा व पंचनामा करून सदर वाहने व रेती एकूण किंमत 2,56,26,000/-पुढील कार्यवाही करण्याकरिता पोलीस स्टेशन येथे आणलेली आहेत. माननीय तहसीलदार सिंदेवाही यांना तसेच आरटीओ यांना पुढील कार्यवाही करण्याकरिता लेखी अहवाल पाठवण्यात येत आहे.
त्याच प्रमाणे मौजा तांबे गडी मेंढा तालुका सिंदेवाही या ठिकाणी नदी मार्गातून अवैध रेती चोरी करीत असलेल्या इसम नामे हिरज विश्वनाथ सुरपाम वय 35 वर्षे राहणार पाथरी तालुका सावली याला त्याचे ताब्यातील रेतीने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली एकूण किंमत रुपये 5,05,000/- असे ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या कारवाईमुळे रेती तस्करा मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.