Top News

आता 50 नव्हे, तर 25 जणांच्या उपस्थितीतच उरकावं लागणार "शुभमंगल" नवे निर्बंध जारी....

Bhairav Diwase. April 14, 2021
मुंबई:- राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अशातच राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू असणार आहे. अशातच आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लग्न सोहळ्यांसाठीही नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या नव्या निर्बंधांनुसार, आता 50 नव्हे, तर 25 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे.

काल (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह मार्फत राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस संचारबंदीची घोषणा केली.

अशातच आता जर या संचारबंदी च्या काळात तुम्ही लग्न करणार असाल किंवा तुमचं लग्न नियोजित असेल तर राज्यात आता लग्न समारंभांसाठी नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.


नव्या नियमावलीनुसार, लग्न सोहळ्यांना केवळ 50 नाहीतर 25 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. तसेच लग्न सोहळ्याच्या नियोजनासाठी तुम्ही जर केटरिंग किंवा इव्हेंट कंपनीची मतद घेणार असाल तर त्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक असणार आहे. तसेच लग्नसोहळ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन झालं तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आधी लग्नसोहळ्यांसाठी 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा होती. पण आता कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ 25 जणांच्या उपस्थितीच लग्नसोहळा उरकावा लागणार आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत 15 दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली. बुधवारी म्हणजेच, आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात येणार असून पुढिल 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने