Click Here...👇👇👇

गोवरीत कोवीड रुग्णांची संख्या 66 वर.......

Bhairav Diwase
1 minute read
गोवरी ठरताहेत कोरोनाचे हॉटस्पॉट.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- मागील दोन आठवड्यापासून गावात तापाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाने अँटीजीन तपासणी शिबीर लावलेले आहे. तापाच्या साथीत आतापर्यंत दोन व्यक्ती मृत्यू झालेला आहे त्यामुळे गावातील नागरिकही दहशतीत आहेत. आरोग्य विभागा मार्फत दोन दिवसापासून अँटीजीन तपासणी सुरू आहे. आत्तापर्यंत 170 नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यात 42 नागरिक कोरोना बाधित आढळले. सद्यस्थितीत गौवरी येथे 66 रुग्ण ऍक्टिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश नगराळे यांनी दिली. यात 18 वर्षाखालील तरुणांचे व एका सहा वर्षीय मुलाचा सुद्धा समावेश असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोविंड रुग्णांची संख्य वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये गोवरी गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले आहे. त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे.