आगग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला भाजपा कार्यकर्ते गेले धावून!

Bhairav Diwase
Bhairav Diwase. April 18, 2021
कोरपना:- गडचांदूर येथिल कृषी उपन्न समिती परिसरातील कृष्ण नगर प्रभाग क्र एक येथील श्री देवराव कल्लूरवार यांच्या घराला दि 17/4/2021 च्या मध्यरात्रीला ठीक 1.30 वा दरम्यान अचानक शॉट सर्किटमुळे आग लागली .तेव्हा शेजारीच राहत असलेले भाजप नगरसेवक रामसेवक मोरे याना कळताच भाजपा पदाधिकाऱ्यांना सांगितले तेव्हाच त्यांनी पोलीस स्टेशन व माणिकगड सिमेंट कम्पनी कडे फोन करून पोलीस स्टेशनचे अधिकारी शिंदेसाहेब तसेच विद्युत वितंरन माहिती दिली फायर फिगेट ची गाडी बोलावून आग आटोक्यात आणली परन्तु तोपर्यंत दोन घर पूर्णता जळाले होते.
घरातील टीव्ही, फ्रीज, कुलर, फंखे, गॅसचा सुद्धा स्फोट झाला. अनाज,व काही नगदी रक्कम रुपये जळून खाक झाले. एकूण अंदाजे सात ते आठ लाख रुपये नुकशान झाली. सुदैवाने जीवहानी टळली.भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार,नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे ,रामचंद्रजी पोटदुखे,यांनी सकाळी भेट देऊन .तात्पुरते घर उभारणी करिता टिन, पाईप,सिमेंट डेरी,बांबू,कपडे,व जेवणाची व्यवस्था करून स्वयंपाकाचे भांडे भेट देण्यात आले तसेच तहसीलदार कोरपना यांना माहिती देण्यात आली लगेच तलाठी अन्सारी यांनी प्रत्येक्ष भेट दिली व पंचनामा करून अहवाल मा तहसीलदार कोरपना यांना पाठविण्यात आला.तात्पुरते साहाय्य धान्य किट देण्यात आली व व्यंकटेश गॅस एजन्सी कडून सुद्धा गॅस चा पंचनामा करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांनी मदत केल्याने कल्लूरवार कुटुंबाकडून त्यांचे आभार मानले.