Click Here...👇👇👇

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत धनराज दुर्योधन द्वितिय

Bhairav Diwase



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- इतिहासाचा परामर्श घेतल्याशिवाय वर्तमानाचे कर्तव्य पुर्ण होत नाही तर भविष्याचे केलेले नियोजन कोलमडुन पडल्याशिवाय राहत नाही हा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराजाच्या समग्र जीवनाचा अभ्यास करणे हे आज अगत्याचे झाले आहे. शिवाजी महाराजाचे कमालीचे आकर्षण व आदर चारशे वर्षानंतर आजही दिवसेदिवस वाढत आहे याचे कारण छत्रपती शिवाजी महाराज कसे होते. यापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते यात दडलेले आहे. शिवाजी महाराजाच्या कार्याची माहिती व्हावी या उदात्त हेतुने रिफ्लेक्टिव्ह रिडर्स समुह व परिवर्तनवादी साहित्यिक समुह सातारा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
   या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राजक्ता भोसले (जि.सातारा), द्वितिय क्रमांक धनराज  रघुनाथ दुर्योधन (जि.चंद्रपूर) तर तृतिय क्रमांक सुशांत म्हात्रे (जि.रायगड ) यांनी पटकावला. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवुन दिलेल्या विषयावर निबंध लिहिला.या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन प्राध्यापक अमोल कांबळे व अॅड.दयानंद माने यांनी काम पाहिले. सहभागी सर्व स्पर्धकाना सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले. रिफ्लेक्टिव्ह रिडर्स समुह व परिवर्तनवादी साहित्य समुहच्या टिमनी सर्व विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.