(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- शेतमजुराचा एकुलता मुलगा मागील ४-५ वर्षापासून एअरटेल केबल कंपनीचे काम करत होता. गुरुवारी सकाळी ९ वाजता तो भूमिगत केबलचे काम तेलंगणा राज्यातील वाकडी ते आसिफाबाद दरम्यान करत होता. नेमक्या त्याचवेळी दरड कोसळली. यात दबून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. मृतक तरूणाचे नाव सुरज महाकाली टेकाम (२५) रा. विसापूर असे आहे. सुरज टेकाम हा होळी सणासाठी गावात आला होता. होळीचा सण साजरा करून तो तीन दिवसांपूर्वी कामावर गेला होता.