Top News

नक्षल हल्ल्यात बेपत्ता असलेल्या २१ पैकी १४ पोलीस जवानांचे मृतदेह सापडले.

चकमकीत तब्बल १९ पोलीस जवान शाहिद; शहिदांचा आकडा वाढण्याची शक्यता?
Bhairav Diwase.     April 04, 2021
छत्तीसगड:- काल छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात पोलीस-नक्षलमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत ५ जवान शाहिद झाले होते तर ३० हुन अधिक जवान जखमी झाले होते. मात्र या पोलीस पथकातील २१ जवान अद्याप बेपत्ता असल्याची माहिती छत्तीसगड पोलीस प्रशासनाने दिली होती आणि बेपत्ता असलेल्या पोलीस जवानांना शोधण्यासाठी मोहीम राबविली गेली. दरम्यान आज १४ जवानांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 'एएनआय'च्या माहितीनुसार, काल चकमक झाली त्याच परिसरात आणखी १४ जवानांचे मृतदेह आढळून आले.

त्यामुळे आता या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा १९ वर पोहोचला आहे.

या चकमकीवेळी घटनास्थळी २०० हून अधिक नक्षलवादी उपस्थित होते. या घटनेत जखमी जवानांना बाहेर काढण्यासाठी दोन एमआय १७ हेलिकॉप्टर आणण्यात आले होते. जखमी झालेल्या जवानांमधील २३ जणांना बीजापूर तर ७ जणांना रायपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाचा असा दावा आहे, की या चकमकीत पंधराहून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने