(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मुल तालुक्यातील येरगाव रेती घाटावर आज सकाळी सहा वाजताचे दरम्यान अपघात होऊन रेती घाटावर काम करणाऱा ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या इसमाचे नाव किशोर बबनराव मुनगेलवार (40) मृतक चंद्रपूर येथिल रहिवासी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक किशोर मुनगेलवार हा ट्रक वरुन तोल जाऊन खाली पडल्याने जखमी झाला. प्रकृती गंभीर असल्याने त्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केल्यानंतर उपचारादरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला.
सध्या मूल तालुक्यातील रेती घाट सुरू झाले आहेत, हे घाट सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर रेती उपसा करता येत नाही. मात्र थेरगाव येथील हा घाटातून दिवस-रात्र 24 तास रेतीचा उपसा करण्यात येतो. आज भल्या पहाटे झालेल्या अपघातावरूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. रेती घाटावर सकाळी 6 वाजता ट्रक वरुन तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असले तरी, जेसीबीचा धक्का लागल्यानेच किशोर चा मृत्यू झाल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू होती. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.