Top News

13 वर्षीय सख्ख्या मुलीचा वडील करायचे वारंवार विनयभंग.

मुलीची पोलिसात तक्रार दाखल; वडील अटकेत.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
राजुरा:- वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपूर येथे उघडकीस आली असुन आपल्याच 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात आरोपी नराधम वडीलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर येथे वास्तव्यास असणार्‍या 6 व्या वर्गातील एका 13 वर्षीय मुलीने आपल्याच वडीलांविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली असुन मन सुन्न करणार्‍य ह्या घटनेचा आरोपी वडील पोलिसांच्या ताब्यात आहे. घटनेतील पीडित मुलगी ही आरोपीची सख्खी मुलगी असुन आई कामावर गेल्यानंतर भावाला काहीतरी कारणाने बाहेर पाठवून नराधम वडील आपल्याच मुलीसोबत अश्लील लैंगिक चाळे करत असल्याची धक्कादायक घटना मुलीने हिंमत केल्याने अखेरीस उघडकीस आली.

चंद्रपूर येथिल प्रसिद्ध समाजसेविका तसेच फ्रेंड्स चॅरिटी गृप च्या अध्यक्षा सरिता मालू ह्यांना घटनेची माहिती होताच काल दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी रात्री 11:30 च्या सुमारास त्यांनी पीडित मुलीचे घर गाठून मुलीची सविस्तर चौकशी करून तिला तक्रार दाखल करण्यास मार्गदर्शन केले. शेवटी मुलीने आपली संपुर्ण हिंमत एकवटून नराधम पित्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

मुलीच्या म्हणण्यानुसार तिचे वडिल आई घरी नसताना काही ना काही बहाण्याने वारंवार तिच्या छातीला, गुप्तांगांना तसेच पार्श्वभागाला वाईट हेतूने स्पर्श करत होता त्याचप्रमाणे मुलगी आंघोळीला गेली असता चोरून लपून तिला बघत होता. ही बाब मुलीच्या लक्षात आल्याने तिने वडीलांपासुन अंतर राखणे सुरू केले असता आईला काही सांगितल्यास अथवा विरोध केल्यास जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची तक्रार मिळताच रामनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी नराधम वडीलांना अटक केली असुन आरोपी विरुद्ध भादंवीच्या कलम 354 A, 354 C, 323, 506, बालकांचे लैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोस्को) नुसार कलम 8, 9(N) तसेच कलम 10 अन्वये गुन्हा दाखल केला असुन ठाणेदार रोशन यादव ह्यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पो. उ. नी. चंदा दंडवते करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने