Top News

मुलीचे लग्न दुसरीकडे ठरले; प्रेमी जोडप्याने एकाच दोरीने दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले.


Bhairav Diwase.        April 09, 2021
हिंगोली:- हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी शिवारात प्रेमीयुगुलाने शेतात एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अजय केशव डुकरे (१८) व सरस्वती देवीदास कऱ्हाळे (१७) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाची नावे आहेत.

      या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथील अजय केशव डुकरे यांच्या शेतात हळद पिकाची काढणी सुरु आहे. त्यामुळे शेतात रात्रीच्या वेळी जागरण करण्यासाठी जात असे. त्यानुसार ८ एप्रिलच्या रात्री १० वाजता घरी जेवण करून अजय शेतात जातो असे सांगून घराबाहेर पडला. नेहमीच अजय शेतात जात असल्याने घराच्यांनी परवानगी दिली. मात्र, शुक्रवारी सकाळी ( ९ एप्रिल ) काही शेतकऱ्यांना केशव डुकरे यांच्या शेतात अजय आणि सरस्वती एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

ही माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहणी केली असता आत्महत्या केलेले अजय डुकरे व सरस्वती कऱ्हाळे असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे स.पो.नि. रवीकांत हुडेकर, जमादार भगवान वडकिले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. दरम्यान, मयत अजय डुकरे हा परभणी येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेत होता. तर सरस्वती कऱ्हाळे यांचे वडील गुंडलवाडी येथेच पाच वर्षांपासून सालदार म्हणून काम करतात. सरस्वतीचा विवाह ठरला होता. त्यासाठी तिचे कुटुंबिय त्यांच्या मुळगावी राजदरी(ता. औंढा) येथे जाणार होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने